तुला माझी सवय होताना
ती मोडताना... पाहिलंय मी
तुला हातातून निसटताना पाहिलंय मी
तुला मला श्वासात भरून घेताना
मला तुझा श्वास होताना... पाहिलंय मी
तुझ्या श्वासावर दुसर्याचा हक्क... पाहिलंय मी
तू जेवढा मिळशील तेवढा माझा
अगदी क्षणभरसुद्धा...
तुला अखंड दुसर्याचा होताना पाहिलंय मी
माझ्यात पूर्णपणे विरघळलेल्या तुला
माझ्या रोमारोमांतून विलग होताना पाहिलंय मी
माझ्यासाठी क्षणाक्षणाला हळवा होणारा तू
माझं अस्तित्व नाकारताना तुला... पाहिलंय मी
-कायांप्रि
Comments
Post a Comment