आयुष्य समुद्रकिनार्यासारखं आहे.
आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस, व्यक्ती, घटना त्या लाटेसारख्या आहेत ज्या सतत किनार्यावर येऊन आदळतात; पण राहात मात्र नाहीत.
लाट... प्रत्येकीचा आकार वेगळा, रंग वेगळा, आवाज वेगळा, स्वतःबरोबर वाहून आणलेल्या गोष्टी वेगळ्या.
येणारी प्रत्येक लाट किनार्यावर काहीतरी सोडून जाते, एक संदेश लिहून जाते.
ते वाचत राहणं आणि त्याचा अर्थ समजून घेणं ही एक साधना आहे. कारण येणारी प्रत्येक नवीन लाट वाळूवरचा आधीचा संदेश पुसून टाकते आणि नवा संदेश लिहिते.
Comments
Post a Comment