Skip to main content

Posts

Showing posts from 2018

तुझ्याशिवाय...

कि त्तीदा तुला आठवायचं कितीदा तुला साठवायचं मी जपत राहते , तू मात्र मनमानी करून काहूर उठवायचं हु रहुरत राहते मी होत राहते तुझ्यात व्यक्त जोवर तुला कुणी छेडत नाही तोवर तू मत्र अव्यक्त तु झ्याशी बोलताना मला तुला मुठीत धरून ठेवावं वाटतं तुझं अंतरंग मत्र ओरखड्यांतून उमटतं वे ड बघ माझं तुझे ओरखडेही शब्द वाटतात तुझ्या सहवासात अकारणच कल्लोळ मनात दाटतात मी जाते आटोपशीर वागायला पसारा भलताच तुझा आवरायला गेलं की कळतं तू तर रंग ओतलायस माझा वे ळी-अवेळीही नजरेनं पाठलाग तुझा तुझ्याशिवाय रे कशी जगेन तू भेट फक्त... मग म्हणेन , “ अगंबाई! सापडलं की माझं पेन!! ” -कायांप्रि

अकेले हम

कुछ अपने अपने ना रहे परायों का साथ निभाने चले है दूसरों से क्या उम्मीद करे जब अपने ही पराये बन चले है कुछ रिश्ते टूट रहे है कुछ को हमने तोड दिया कुछ खुशियाँ आँखों से छूट रही हैं कुछ को हमने छोड दिया फनाह करना था खुद को कही अब बली चढ रहे है कही मंजिलों पे चलने का ख्वाब था अब सपने ही बदल रहे हैं कही आँखों में आँसूओं के बादल हैं इतने कि कभी भी बरसने लग जाएँगे आँसूओं के साथ बह जाएँगे कुछ सपने जो लौटकर कभी ना आएँगे लोग हैं हर जगह यहाँ हर तरफ मेले हैं काश कोई समझ भी लेता इस भीड में हम अकेले हैं -कायांप्रि

गर्दी आणि मी

आ पल्याच विचारात त्या उतारावरून उतरत होते. उतार संपत आला. थोडंसं वळून गेल्यावर समोर मुख्य रस्ता आला. आणि मग आली समोर प्रचंड गर्दी. कोपर्‍यावर थांबून त्या गर्दीचे कुठूनही कसेही वाहणारे प्रवाह पहात होते. काय नव्हतं त्या गर्दीत ? गर्दीत गर्दी करणारे तरूण-तरूणींचे घोळके , खरेदीसाठी बाहेर पडलेले लोक , कानात headphones घालूनसुद्धा अगदी रस्त्यापलीकडे ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात “ traffic में फँस गया हूँ सर... ” म्हणत mobile shop समोर नवीन model (mobile चं!) बघत घुटमळणारे , गर्दीत एकांत शोधणारे , “ कित्ती गर्दी आहे! ” ची तक्रार करत आपल्या अजस्र देह आणि लवाजम्यासहीत गर्दीत घुसणारे , गर्दीत हिरवळ शोधणारे , गर्दीत हिरवळ असणार्‍या , class ला वेळ आहे म्हणत timepass करत फिरणारे , कुणी गर्दीत असूनही एकटे , कुणी एकटे असूनही ‘ एकटे ’ नसणारे... कितीतरी जण. अशा या गर्दीत आपण नक्की कोणत्या भूमिकेनं शिरावं असा विचार पडला होता मला. डोळे बंद केले. बंद डोळ्यांनाही ठसठशीतपणे जाणवावं असं अस्तित्व होतं त्या गर्दीचं. कानांत असंख्य गलके ऐकू येत होते... डोळे उघडले. तीच गर्दी. चेहरे बदलत असले तरी

तूच तू

पडली निसर्गा भूल तू सृजनाची चाहूल तू सत्य-असत्याची हूल तू रांगडे कोमल तृणफूल तू भक्तीचा या भक्त तू लज्जेसवे आरक्त तू विजनाहूनी विरक्त तू जवळी तरी विभक्त तू गुंत्यातही स्वमग्न तू मूर्तीतूनी बघ भग्न तू भास की आभास हा स्वप्नास पडले स्वप्न तू सृष्टीचे सामर्थ्य तू धर्मात लपला स्वार्थ तू अनाकलनाचा अर्थ तू तुजविण परि व्यर्थ तू जाणिवपूर्वक कृती तू जाणिवेची गती तू कुंठीत करीशी मती तू गतीस पडली भीती तू मुखवट्यामागचे सत्य तू मुखोद्गत असे असत्य तू खेळातील सातत्य तू ना येशी तरी मग नित्य तू पिल्लापरी स्वच्छंद तू थेंबांसवे मग कुंद तू गंधात या बघ धुंद तू वार्‍यासवे बेधुंद तू आभासाचा भास तू सुटला नकळत श्वास तू हवाहवासा त्रास तू श्वासाहूनी उत्कट ध्यास तू ज्योतीची या मग प्रीत तू भ्रमरास सुचले गीत तू अलौकिक दिवाभीत तू पराजिताची जीत तू मोहास होई मोह तू मोहाचा खोल डोह तू कामनेचा आरोह तू अपेक्षाभंगाचा अवरोह तू अपूर्णाचे पूर्णत्व तू काट्याचे ममत्व तू गहनाचे सत्व तू मनाचे मम स्वत्व तू शब्दांविणही व्यक्त तू शब्दांसवे अव

गर्दी

गर्दी...  विचारांना प्रवाही ठेवणारी प्रवाहांच्या दिशा बदलणारी माणसांचे भोवती गोतावळे विचारांसाठी रान मोकळे गर्दी...  बाहेर माणसांची , आत विचारांची गर्दीतले विचार , गर्दी विचारांची गर्दी...  बाहेर संभाषणांचा गलका आत शांततेसाठी भडका गर्दी...  सगळ्यांना सामावून घेणारी पण तरीही अनोळखी माणसांत असूनही माणुसकीला पारखी गर्दी...  एक सुख जिवंतपणाचं गर्दी...  एक दुःख दुरावलेपणाचं गर्दी..... -कायांप्रि

What Are You?

A person is like a photograph. When we alter that photo with some photographic effects, the perception of looking at that photo changes though it’s the same photograph. Every photo contains same basic colors. We intensify some of the colors from some of the points, we get a different look. We take it in a black and white form, we can’t see the colors of the picture. Take it in colorful form, barely can see the simplicity. Then what makes the difference? Lights, camera, mood, situation, angles, depth, focus, colors, photographer’s view point, viewer’s point of view and so on… A person is like a dish. It’s made up of various ingredients and sometimes, forms a totally different taste. Every dish, too, has some same basic ingredients. With these same ingredients, number of dishes could be made. So if every dish is made up of some same ingredients, why it tastes different? The way of making it, cooking style, process, sequence of adding ingredients, time, temperature, heat, prese

...तू पुन्हा परतून यावे

अंधार एकांत दाटला हा मज कोठ जावे ना कळे जीवनाच्या वाळवंटी आशेची ही मृगजळे विश्वास पडला धारातीर्थी पानिपतचा संग्राम हा शूरास संजीवनीच दुर्लभ काय दैवदुर्विलास पहा! विझती मृत्यूच्या कुशीत श्वास अंती कोवळे... नकाराच्या अपयशा पुन्हा तुसडाच हा नकार का श्वासाहूनी अनमोल जीव मग आत्मघात पर्याय का शोधा पहा लपले कुठे डोळे निरागस भाबडे... वर्जिलेल्या उष्ट्यावरी कुत्र्यांच्या सजती पत्रावळी हातावरी पण पोट ज्याचे नशिबात ना भाकर शिळी हाताची खाज संपे कधी ना जिव्हा सदोदीत पाघळे... बुद्धीबल की वित्तबल हे का ही फोफावते गं फांदी काळी-पांढरी , कृष्ण-धवल दुटप्पी आहेत सर्व प्यादी असह्य मज ही स्पंदने अन् भावनांची वादळे... हे अलौकिक बालपणा तू पुन्हा परतून यावे सुखात अज्ञानाच्या पुन्हा तू मला लोटून द्यावे नको कोरडी ती मलमपट्टी ना जखम जी भळभळे जीवनाच्या वाळवंटी आशेची ही मृगजळे... -कायांप्रि

मन

मन दरवळणारे अत्तर मन प्रश्नांचे त्या उत्तर मन क्षितिज विस्तारांचे मन पटल विचारांचे मन फडफडणारी आशा मन तडफडणारा मासा मन तळ्यात , मन मळ्यात मन तळ्या-मळ्याच्या बुचकळ्यात मन बुडबुडा विचारांचा मन विचार तव स्वप्नांचा मन कासाविस उसासे मन निश्चिंत जरासे मन हळवे कातरवेळी मन चिंतांची जाळी मन मातीविण मळके मन कधी कधी जळके मन मोहाचे साधन मन लालसेचे वाहन मन निर्मळ जळ मन मैलभर मळ मन भास की आभास मन नुसताच विरोधाभास मन कळतं , न कळतं मन कळतं नकळत -कायांप्रि

8 Easiest Ways to Sleep Tight

We work.  We work a lot.  We often don’t realize that we are working our body.  We eat, we talk, we walk, we work, we cook, we see, we think, we listen. We do a lot of work. Even when our body stops performing most of its jobs, our mind doesn’t. They both need rest. There is nothing better than a good-night sleep. A healthy mind makes the body healthy and both of them lead a healthy life. 1.        Don’t force. You are not a machine which starts and shuts down with a button. Don’t force yourself because it’s time to sleep. Give some time to your body to rest itself. Let your body and mind prepare themselves to sleep. As we need some time to wake up fully, we need time to fall asleep too. Don’t force yourself saying ‘You should sleep now’ . It might work adversely. 2.       Stretch your body. Before you go to bed, stand near your bed and stretch your whole body any possible way you can at once. You don’t need to do exercises here. Don’t overdo it. Just stretch it a bi