Skip to main content

गर्दी आणि मी




पल्याच विचारात त्या उतारावरून उतरत होते. उतार संपत आला. थोडंसं वळून गेल्यावर समोर मुख्य रस्ता आला. आणि मग आली समोर प्रचंड गर्दी. कोपर्‍यावर थांबून त्या गर्दीचे कुठूनही कसेही वाहणारे प्रवाह पहात होते. काय नव्हतं त्या गर्दीत? गर्दीत गर्दी करणारे तरूण-तरूणींचे घोळके, खरेदीसाठी बाहेर पडलेले लोक, कानात headphones घालूनसुद्धा अगदी रस्त्यापलीकडे ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात traffic में फँस गया हूँ सर... म्हणत mobile shop समोर नवीन model (mobileचं!) बघत घुटमळणारे, गर्दीत एकांत शोधणारे, कित्ती गर्दी आहे!ची तक्रार करत आपल्या अजस्र देह आणि लवाजम्यासहीत गर्दीत घुसणारे, गर्दीत हिरवळ शोधणारे, गर्दीत हिरवळ असणार्‍या, classला वेळ आहे म्हणत timepass करत फिरणारे, कुणी गर्दीत असूनही एकटे, कुणी एकटे असूनही एकटे नसणारे... कितीतरी जण.

अशा या गर्दीत आपण नक्की कोणत्या भूमिकेनं शिरावं असा विचार पडला होता मला. डोळे बंद केले. बंद डोळ्यांनाही ठसठशीतपणे जाणवावं असं अस्तित्व होतं त्या गर्दीचं. कानांत असंख्य गलके ऐकू येत होते... डोळे उघडले. तीच गर्दी. चेहरे बदलत असले तरी गर्दी तीच. फूटपाथच्या काठावर उभी होते. फक्त एका पावलाचं अंतर होतं त्या गर्दीत आणि माझ्यात...

खरंतर गर्दी ही काही विचित्र किंवा वाईट गोष्ट नाहीये. तरीही त्या खांबाला टेकून मी गर्दीत जावं, शिरावं, घुसावं की झोकून द्यावं याचा विचार करत होते. ती गर्दी आपली कुणीही नसली तरी आपल्याला किती पटकन सामावून घेते ती आपल्यात. त्या गर्दीचाच एक भाग होऊन जातो आपण. लांबून बघितलं तर वेगवेगळे रंग इकडून तिकडे प्रवाहीत होताहेत असं वाटतं. रंग पाण्यात टाकला तर त्याला आपण त्याला रंग नाही म्हणत, रंगाचं पाणी म्हणतो. तर असे हे या रंगाच्या पाण्यावर तरंगणारे रंगीत ठिपके माझ्यासमोरून इथे-तिथे बागडत होते. या ठिपक्यांना स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्या गर्दीपासून लांब जाण्याची गरज नाही. गर्दीत राहून गर्दीबरोबरचं होता आलं पाहिजे आणि तरीही हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं अस्तित्व काय आहे. मगच रंगूनी रंगात सार्‍या, रंग माझा वेगळाची मजा कळेल. कितीतरी रंग लांबूनएकसारखे दिसत असले तरी जवळ गेल्यावर त्यातल्या छटा मन मोहून टाकतात. तेच त्यांचं वेगळेपण असतं.

धक्का लागला म्हणून बाजूला बघितलं तर एक लहान मुलगा आपलं दप्तर सांभाळत गोड हसून सॉरी म्हणत निघून गेला. काही क्षण तो गेला त्या दिशेला बघत बसले होते मी. मग लक्षात आलं, मघाशी उभी होते ते ठिकाण खूपच मागे पडलं होतं. विचारांच्या गर्दीनं मनात शिरकाव केला होता, पावलं या गर्दीत तेव्हाच मिसळून गेली होती.


-कायांप्रि

Comments

Popular posts from this blog

Dreams

  Though he cried a little At least he cried a little   Maybe he caused some troubles But always gave the doubles   Dreamt of impossible Behaved unreasonable But with passion incomparable   The more he fight The more the delight The higher his dreams took flight   Fell, trampled over Tricked, tripped, but lost never   Always a believer Always a dreamer - Kayanpri 

सत्य

सत्य ... हा केवळ एक भास आहे . पटत नाही ना ? पण हेच सत्य   आहे . जगातलं शाश्वत किंवा त्रिकालाबाधित सत्य कोणतं , असं विचारलं तर त्याचं उत्तर कोणीही देऊ शकणार नाही . स्वतः काळही नाही . सत्य अबाधित असू शकत नाही . त्याला नेहमी अपवाद असतात जे त्याच्या अखंडपणाला बाधा आणत असतात . सत्य खरंच एक भास आहे . एखादी गोष्ट ‘ पूर्ण सत्य ’ आहे असे कुणी छातीठोकपणे सांगू शकेल का ? आपल्याला गोष्टी एकाच बाजूने दिसतात आणि मग त्याच आपण ‘ पूर्ण सत्य ’ मानून चालतो . सत्य नाण्याच्या दोन बाजूंसारखं दोन भागांत विभागलेलं असतं - एक , जे आपल्याला दिसतं ; दुसरं , जे त्यामागे असतं . म्हणजे जे आपल्याला माहीत झालेलं असतं ते ‘ अर्ध ’ सत्य असतं आणि तरीही लोक ‘ मला पूर्ण सत्य माहीत आहे ’  चा दावा करतात बिनधास्त . नाण्याच्या दोन्ही बाजू एकदम कधीच बघता येत नाहीत . एक बघावी तर दुसरीने पाठ फिरवलेली . हां , आरशासमोर उभे राहिलात तर एकाचवेळी दोन्ही बाजू बघता येतील . पण हे ही लक्षात ठेवायला हवं की त्या नाण्याबरोब

समांतर

  काचेअलीकडे बसलेले मी इमारतींच्या मागून डोकावणाऱ्या तुला बघत बसते आपली खूप ओळख आहे असं नाही पण तू अनोळखी तरी कुठे आहेस? वाढणाऱ्या वेगाबरोबर तुला बघण्याची वाढत जाणारी तीव्र ओढ आणि तुला जवळ घेण्याचा अनावर होत असलेला मोह इमारतींच्या खिडक्या लुकलुकत राहतात डोळ्यांसमोर नजरेतला तू मात्र हटत नाहीस धावणाऱ्या वेगाबरोबर श्वासांचा वाढता वेग आणि त्याच गतीने वाढणारी तुझ्याकडे झेपावण्याची ओढ मग खेळतोस तू खेळ लपाछपीचा मोठ्या इमारतींमागून तरळत राहते तुझी प्रतिमा डोळ्यांसमोर तुझ्यापेक्षा मग तुझ्या प्रतिमेसाठीची आसक्ती वाढत जाते आणि मग अस्वस्थ व्हायला लागतात एकेक अणुरेणू श्वासातले मंदावत जातो वेग आणि कानावर पडतात अनोळखी आवाज तितक्यात कुठूनशी चुकार रातराणी भिरकावून देते आपला गंध उघड्या काचेतून आत आणि मग अस्वस्थ श्वासांच्या लयीवर नाचत राहतो तो सुवास अंतरात दरवळत जातो, रोमारोमांत तरळत जातो मंद मंद मग डोळ्यांसमोर अवतरते तुझी प्रतिमा पण आता प्रतिमेपेक्षा तुझी ओढ अधिक आहे झाडांच्या मागे लपलेला तू अजून हवाहवासा वाटतोस श्वासांत भिनलेली मोहक रातराणी तुझ्या सहवासाची सय व