Skip to main content

Posts

Showing posts from April, 2021

पाहिलंय मी

  तुला माझी सवय होताना ती मोडताना ... पाहिलंय मी   तुला हातातून निसटताना पाहिलंय मी   तुला मला श्वासात भरून घेताना मला तुझा श्वास होताना ... पाहिलंय मी तुझ्या श्वासावर दुस ‍ र् ‍ याचा हक्क ... पाहिलंय मी   तू जेवढा मिळशील तेवढा माझा अगदी क्षणभरसुद्धा ... तुला अखंड दुस ‍ र् ‍ याचा होताना पाहिलंय मी   माझ्यात पूर्णपणे विरघळलेल्या तुला माझ्या रोमारोमांतून विलग होताना पाहिलंय मी   माझ्यासाठी क्षणाक्षणाला हळवा होणारा तू माझं अस्तित्व नाकारताना तुला ... पाहिलंय मी -कायांप्रि 

रेत

रेत को मुठ्ठी में पकडने की कोशिश मत करो। उसने तो फिसल ही जाना है हाथ से ! उससे अपना घर बनवा लो। घर का घर भी बन जायेगा , रेत भी साथ ही रहेगी सारी जिंदगी।   वैसे भी , मरने के बाद इन्सान ने उसी मिट्टी में मिल जाना है। फिर क्या फायदा उसे मुठ्ठी में बंद करने का ?   वक्त भी इसी रेत की तरह है। उसके पिछे भागकर उसे पकडने की कोशिश मत करो। उसने तो फिर भी निकल ही जाना है हाथ से ! उसे इस्तेमाल करो।   गुजरते वक्त के साथ हमे भी तो गुजर ही जाना है एक दिन ...    -कायांप्रि 

सत्य

सत्य ... हा केवळ एक भास आहे . पटत नाही ना ? पण हेच सत्य   आहे . जगातलं शाश्वत किंवा त्रिकालाबाधित सत्य कोणतं , असं विचारलं तर त्याचं उत्तर कोणीही देऊ शकणार नाही . स्वतः काळही नाही . सत्य अबाधित असू शकत नाही . त्याला नेहमी अपवाद असतात जे त्याच्या अखंडपणाला बाधा आणत असतात . सत्य खरंच एक भास आहे . एखादी गोष्ट ‘ पूर्ण सत्य ’ आहे असे कुणी छातीठोकपणे सांगू शकेल का ? आपल्याला गोष्टी एकाच बाजूने दिसतात आणि मग त्याच आपण ‘ पूर्ण सत्य ’ मानून चालतो . सत्य नाण्याच्या दोन बाजूंसारखं दोन भागांत विभागलेलं असतं - एक , जे आपल्याला दिसतं ; दुसरं , जे त्यामागे असतं . म्हणजे जे आपल्याला माहीत झालेलं असतं ते ‘ अर्ध ’ सत्य असतं आणि तरीही लोक ‘ मला पूर्ण सत्य माहीत आहे ’  चा दावा करतात बिनधास्त . नाण्याच्या दोन्ही बाजू एकदम कधीच बघता येत नाहीत . एक बघावी तर दुसरीने पाठ फिरवलेली . हां , आरशासमोर उभे राहिलात तर एकाचवेळी दोन्ही बाजू बघता येतील . पण हे ही लक्षात ठेवायला हवं की त्या नाण्याबरोब