Skip to main content

Posts

बाकी काही नाही

उ ठायला उशीर दुखरं अंग सोफ्यावर लोळणा‍र्‍या उश्या बाकी काही नाही अ र्धवट झोप पावाचे दोन तुकडे चुलीवरची पिठलं-भाकरी बाकी काही नाही च ढायला लागलेला सूर्य पळायला लागलेली वेळ खुर्चीवर उताणं पडलेलं पुस्तक बाकी काही नाही धू ळ , धूर , फाटणारे कानांचे पडदे माणसांची , गाड्यांची कचकच फुटबॉल खेळणारी , सायकलवाली पोरं बाकी काही नाही ते च चेहरे , तोच आवार तोच लॅपटॉप , तेच विचार ड्रॉवरमध्ये पडलेलं पिक्चरचं तिकीट बाकी काही नाही कॉ फीचे कप , कॅन्टीनचं जेवण त्याच गप्पा , तेच विनोद अचानक भरून आलेलं आभाळ बाकी काही नाही का म-तासाची झटापट ओव्हरटाईम , बॉसची कटकट पावसाच्या झडीत गाडी भजीची बाकी काही नाही प गाराची बेरीज खर्चाची वजाबाकी हप्त्याच्या गुणाकारासोबत कर्जाचा भागाकार बाकी काही नाही तु डुंब रस्ते , वाहतुकीची कोंडी दुस‍र्‍याच्या छत्रीचं गळणारं पाणी केसांतून टिपटिपणारे थेंब , चिंब मन बाकी काही नाही पु न्हा किल्ली नि तेच दार घरातल्या कपड्यांवर आळस स्वार वाहून गेलेला शीण बाकी काही नाही डो क्याची मंडई किटलेले कान...

कुछ राज़ हमारे दिल में हैं

कु छ राज़ तुम्हारे दिल में हैं कुछ राज़ हमारे दिल में हैं हर एक राज़ हसीं तो नहीं फिर भी जी रहे महफिल में है कु छ खिले फूल हैं हाथों में कुछ टूटे कश्तियों के टुक ड़े तमन्ना खूबसूरती की थी कुछ अदा कातिल में है ख्वा हिशों की सरजमीं पर शमा जली अरमानों की खुशियों को चख लिया है हमने कुछ मज़ा मुश्किल में है ब दल गयी कुछ करवटें जाग उठी कुछ सिलवटें जन्नत को छू लिया हाथों ने पैर अभी दलदल में हैं कु छ शमाएँ बुझ गयी कुछ चिताएँ बुझ गयी उठ रहे हैं और तुफाँ उम्मीद अभी साहिल में है -कायांप्रि

तुझ्याशिवाय...

कि त्तीदा तुला आठवायचं कितीदा तुला साठवायचं मी जपत राहते , तू मात्र मनमानी करून काहूर उठवायचं हु रहुरत राहते मी होत राहते तुझ्यात व्यक्त जोवर तुला कुणी छेडत नाही तोवर तू मत्र अव्यक्त तु झ्याशी बोलताना मला तुला मुठीत धरून ठेवावं वाटतं तुझं अंतरंग मत्र ओरखड्यांतून उमटतं वे ड बघ माझं तुझे ओरखडेही शब्द वाटतात तुझ्या सहवासात अकारणच कल्लोळ मनात दाटतात मी जाते आटोपशीर वागायला पसारा भलताच तुझा आवरायला गेलं की कळतं तू तर रंग ओतलायस माझा वे ळी-अवेळीही नजरेनं पाठलाग तुझा तुझ्याशिवाय रे कशी जगेन तू भेट फक्त... मग म्हणेन , “ अगंबाई! सापडलं की माझं पेन!! ” -कायांप्रि

अकेले हम

कुछ अपने अपने ना रहे परायों का साथ निभाने चले है दूसरों से क्या उम्मीद करे जब अपने ही पराये बन चले है कुछ रिश्ते टूट रहे है कुछ को हमने तोड दिया कुछ खुशियाँ आँखों से छूट रही हैं कुछ को हमने छोड दिया फनाह करना था खुद को कही अब बली चढ रहे है कही मंजिलों पे चलने का ख्वाब था अब सपने ही बदल रहे हैं कही आँखों में आँसूओं के बादल हैं इतने कि कभी भी बरसने लग जाएँगे आँसूओं के साथ बह जाएँगे कुछ सपने जो लौटकर कभी ना आएँगे लोग हैं हर जगह यहाँ हर तरफ मेले हैं काश कोई समझ भी लेता इस भीड में हम अकेले हैं -कायांप्रि

गर्दी आणि मी

आ पल्याच विचारात त्या उतारावरून उतरत होते. उतार संपत आला. थोडंसं वळून गेल्यावर समोर मुख्य रस्ता आला. आणि मग आली समोर प्रचंड गर्दी. कोपर्‍यावर थांबून त्या गर्दीचे कुठूनही कसेही वाहणारे प्रवाह पहात होते. काय नव्हतं त्या गर्दीत ? गर्दीत गर्दी करणारे तरूण-तरूणींचे घोळके , खरेदीसाठी बाहेर पडलेले लोक , कानात headphones घालूनसुद्धा अगदी रस्त्यापलीकडे ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात “ traffic में फँस गया हूँ सर... ” म्हणत mobile shop समोर नवीन model (mobile चं!) बघत घुटमळणारे , गर्दीत एकांत शोधणारे , “ कित्ती गर्दी आहे! ” ची तक्रार करत आपल्या अजस्र देह आणि लवाजम्यासहीत गर्दीत घुसणारे , गर्दीत हिरवळ शोधणारे , गर्दीत हिरवळ असणार्‍या , class ला वेळ आहे म्हणत timepass करत फिरणारे , कुणी गर्दीत असूनही एकटे , कुणी एकटे असूनही ‘ एकटे ’ नसणारे... कितीतरी जण. अशा या गर्दीत आपण नक्की कोणत्या भूमिकेनं शिरावं असा विचार पडला होता मला. डोळे बंद केले. बंद डोळ्यांनाही ठसठशीतपणे जाणवावं असं अस्तित्व होतं त्या गर्दीचं. कानांत असंख्य गलके ऐकू येत होते... डोळे उघडले. तीच गर्दी. चेहरे बदलत असले तरी...

तूच तू

पडली निसर्गा भूल तू सृजनाची चाहूल तू सत्य-असत्याची हूल तू रांगडे कोमल तृणफूल तू भक्तीचा या भक्त तू लज्जेसवे आरक्त तू विजनाहूनी विरक्त तू जवळी तरी विभक्त तू गुंत्यातही स्वमग्न तू मूर्तीतूनी बघ भग्न तू भास की आभास हा स्वप्नास पडले स्वप्न तू सृष्टीचे सामर्थ्य तू धर्मात लपला स्वार्थ तू अनाकलनाचा अर्थ तू तुजविण परि व्यर्थ तू जाणिवपूर्वक कृती तू जाणिवेची गती तू कुंठीत करीशी मती तू गतीस पडली भीती तू मुखवट्यामागचे सत्य तू मुखोद्गत असे असत्य तू खेळातील सातत्य तू ना येशी तरी मग नित्य तू पिल्लापरी स्वच्छंद तू थेंबांसवे मग कुंद तू गंधात या बघ धुंद तू वार्‍यासवे बेधुंद तू आभासाचा भास तू सुटला नकळत श्वास तू हवाहवासा त्रास तू श्वासाहूनी उत्कट ध्यास तू ज्योतीची या मग प्रीत तू भ्रमरास सुचले गीत तू अलौकिक दिवाभीत तू पराजिताची जीत तू मोहास होई मोह तू मोहाचा खोल डोह तू कामनेचा आरोह तू अपेक्षाभंगाचा अवरोह तू अपूर्णाचे पूर्णत्व तू काट्याचे ममत्व तू गहनाचे सत्व तू मनाचे मम स्वत्व तू शब्दांविणही व्यक्त तू शब्दांसवे अव...

गर्दी

गर्दी...  विचारांना प्रवाही ठेवणारी प्रवाहांच्या दिशा बदलणारी माणसांचे भोवती गोतावळे विचारांसाठी रान मोकळे गर्दी...  बाहेर माणसांची , आत विचारांची गर्दीतले विचार , गर्दी विचारांची गर्दी...  बाहेर संभाषणांचा गलका आत शांततेसाठी भडका गर्दी...  सगळ्यांना सामावून घेणारी पण तरीही अनोळखी माणसांत असूनही माणुसकीला पारखी गर्दी...  एक सुख जिवंतपणाचं गर्दी...  एक दुःख दुरावलेपणाचं गर्दी..... -कायांप्रि