Skip to main content

Posts

तुकडा

  आपण खूपदा उंचीचा विचार करतो. खोली लक्षातच घेत नाही. पण त्या उंच आकाशालादेखील एक विस्तीर्ण खोली आहे ही बाब लक्षात येत नाही. माणसाचं आयुष्य दारात बसून दिसणाऱ्या आभाळाच्या तुकड्यासारखं आहे. मोठं असूनही एवढंसं, बंदिस्त. तरीही खोल. त्यालाही न समजणारं. त्या ठिकाणापासून जसजसं वर जाऊ, तसतसं कळत जातं - आकाश विस्तीर्ण आहे. समजून घेतलं, जाणून घेतलं तर त्या खोलीत दडलेले अर्थ समजतात. नाही समजून, जाणून घेतलं तर आयुष्यभर    - तुम्हाला स्वतःलाही आणि दुसऱ्यांनाही   -  न सुटणारं कोडं! माणसाची विचारसरणी उच्च झाली की ते कोडं सुटत जातं. आयुष्याची विस्तीर्णता लक्षात येते...

किनारा

  आयुष्य समुद्रकिनार् ‍ यासारखं आहे .  आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस , व्यक्ती , घटना त्या लाटेसारख्या आहेत ज्या सतत किनार् ‍ यावर येऊन आदळतात ; पण राहात मात्र नाहीत .  लाट...   प्रत्येकीचा आकार वेगळा , रंग वेगळा , आवाज वेगळा , स्वतःबरोबर वाहून आणलेल्या गोष्टी वेगळ्या .  येणारी प्रत्येक लाट किनार् ‍ यावर काहीतरी सोडून जाते , एक संदेश लिहून जाते .  ते वाचत राहणं आणि त्याचा अर्थ समजून घेणं ही एक साधना आहे . कारण येणारी प्रत्येक नवीन लाट वाळूवरचा आधीचा संदेश पुसून टाकते आणि नवा संदेश लिहिते .

दिवस एखादा

  अशीच पावसाळी दुपार   समोर कागद - पेन अर्धवट सुचलेली वाक्यं बाहेर पिरपिर सुरू आत मळभ दाटलेलं बाहेर आभाळ रितं होत राहतं इथं भरून आलेलं मन मध्येच एखादी सर येते ‘ खिडकी लावावी का ?’ ‘ नको , सुचेलंच इतक्यात काहीतरी ’ सर पडून गेली तरी कोरा राहिलेला कागद तुषार उडत राहतात कागदावर आणि मनावरही बाहेर वारा मनमौजी आत उगीचच विचारांची भेंडोळी उडत राहतात ‘ पावसावर लिहावं का ?’ ‘ जुना झाला विषय ’ ‘ मग संध्याकाळी भाजी आणावी की कापावा नव ‍ र् ‍ याचा खिसा आठ दुणे सोळा तुकड्यांत ?’ कालच TV वर पाहिलेल्या ‘ ती   सध्या ...’ च्या धर्तीवर ‘ तो सध्या ...’ चा चुकार विचार “ कॉफी करतेस का गं थोडी ?” नवर् ‍ याचा आळसावलेला स्वर उत्तर देण्यापूर्वीच किचनमध्ये भांड्यांचा आवाज अजूनही बाहेर पाऊस आणि समोर कागद कोरा ‘ ठक् ’ टेबलवर दोन मग्स् “ म्हटलं आज जरा तुला डिस्टर्ब करावं ” विस्कटलेले केस , डोळ्यांत अर्धवट झोप आणि थकलेल्या चेहर् ‍ यावर म...

भीती आणि दुर्लक्ष

  मनात शिरकाव केला तिनं तो दिवस कधीच विसरू शकणार नाही मी . आतून बाहेरून हादरून गेले होते मी . तिची कंपनं शरीरभर तरंगत राहिली होती . अजूनही परत येतात ती कधीकधी . मी बेसावध असताना . हळूहळू बांधत नेलेल्या धैर्याच्या भिंतीला ओरखडे उठतात त्या कंपनांनी . तडे जात राहतात मग तिला . आज परत आली ती पुन्हा . धक्के देत देत ती मला माझ्या अस्वस्थतेच्या सीमारेषेकडे घेऊन गेली आणि एका अस्थिर निमिषार्धात ढकलून दिलं तिनं मला त्या रेषेपलीकडे .   भेलकांडत एका नव्या काळोखात जाऊन पडले मी . तिचंच भयंकर रूप होतं ते . जितकं शांत , तितकंच अंगावर येणारं . आधारासाठी भिंत शोधत होते मी . आसपास काहीच नव्हतं ज्याचा आधार घेऊन उभी राहू शकेन . पण हवेत हात चाचपडत होते तेव्हा सतत हाताला काहीतरी बिलगू पहात होतं . त्या अवस्थेतही हात पुढे केला मी . आशेनं ? कुतुहलानं ? काहीतरी आकारविहीन माझ्या त्या हाताला गिळू पहात होतं . त्याची थंड शिरशिरी नसानसांतून वहात गेली आणि मिटून घेतलं मी जमिनीवर स्वतःल...