Skip to main content

Posts

Showing posts from July, 2018

मन

मन दरवळणारे अत्तर मन प्रश्नांचे त्या उत्तर मन क्षितिज विस्तारांचे मन पटल विचारांचे मन फडफडणारी आशा मन तडफडणारा मासा मन तळ्यात , मन मळ्यात मन तळ्या-मळ्याच्या बुचकळ्यात मन बुडबुडा विचारांचा मन विचार तव स्वप्नांचा मन कासाविस उसासे मन निश्चिंत जरासे मन हळवे कातरवेळी मन चिंतांची जाळी मन मातीविण मळके मन कधी कधी जळके मन मोहाचे साधन मन लालसेचे वाहन मन निर्मळ जळ मन मैलभर मळ मन भास की आभास मन नुसताच विरोधाभास मन कळतं , न कळतं मन कळतं नकळत -कायांप्रि

8 Easiest Ways to Sleep Tight

We work.  We work a lot.  We often don’t realize that we are working our body.  We eat, we talk, we walk, we work, we cook, we see, we think, we listen. We do a lot of work. Even when our body stops performing most of its jobs, our mind doesn’t. They both need rest. There is nothing better than a good-night sleep. A healthy mind makes the body healthy and both of them lead a healthy life. 1.        Don’t force. You are not a machine which starts and shuts down with a button. Don’t force yourself because it’s time to sleep. Give some time to your body to rest itself. Let your body and mind prepare themselves to sleep. As we need some time to wake up fully, we need time to fall asleep too. Don’t force yourself saying ‘You should sleep now’ . It might work adversely. 2.       Stretch your body. Before you go to bed, stand near your bed and stretch your whole body any possible way you can at once. You don’t need to do exercises here. Don’t overdo it. Just stretch it a bi

फोटोफ्रेम

भूतकाळ विसरून पुढे जाता यायला हवं. भूतकाळ वाईटच असतो असं नाही. पण तो ‘ भूत ’ काळ असतो. तो त्या भिंतीवर टांगलेल्या फोटोफ्रेमसारखा असावा. म्हणजे येता-जाता आपण तिच्याकडे बघतो. फ्रेम नवीन असते तोपर्यंत आपण सतत त्या फ्रेमकडे पहात असतो. मग हळूहळू ती फ्रेम त्या भिंतीचाच एक भाग होऊन जाते. अविचल , निश्चल... बदलता न येणारी... पण नेहमी तिथेच असणारी. घराची ती भिंत घराला आधार देते... ती फ्रेम आठवणींना... कधीतरी निवांत क्षणी उगाच वाटून जातं की खूप दिवस झाले , त्या फ्रेमवर खूप धूळ बसली आहे. साफ करायला हवी. मग ती फ्रेम साफ करता करता त्या फ्रेमवरची धूळ उतरायला लागते आणि आठवणी उजळायला लागतात. त्या काचेवरची धूलिकणांची गर्दी कमी होत जाते तशी मनात आठवणींची वर्दळ वाढायला लागते. फ्रेम स्वच्छ होते. एकदा त्या फ्रेमकडे समाधानाने पाहिलं जातं. आता जणू ती फ्रेम जिवंत होऊन बोलायला लागेल... पण असं काही होत नाही. ती पुन्हा त्या निश्चल भिंतीचा अविभाज्य भाग बनून जाते. भूतकाळाचंही असंच हवं. भूतकाळही अशी गोष्ट आहे जी टाळता येत नाही , बदलता येत नाही , विसरताही येत नाहीच. पण विसरायचं कशाला ? तो भूतकाळ आपल्याला बर

कोपरे

आपल्या प्रत्येकाच्या मनाचे काही हळवे कोपरे असतात. त्यांना हात घालायची परवानगी दुसर्‍यांनाच काय , स्वत:लाही नसते. आयुष्यात एखादाच नाजूक क्षण , अगदी निमिषार्धासाठी का होईना , येऊन जातो आणि मग तो मनाच्या एखाद्या कोपर्‍यात खोल रुतून बसतो. हळूहळू त्याचा मग एक हळवा कोपरा होतो. ज्याचा त्रास होतोही आणि नाहीही. ज्याच्या जाणिवेने चेहर्‍यावर स्मितहास्य फुलतं आणि नाहीही. संदिग्ध भावना असतात. आपल्याला ती संदिग्धता उलगडावीशी वाटत नाही. त्याची गरजही नाही . आयुष्याच्या कुठल्यातरी एका अनामिक क्षणी आपल्याला ते अकस्मात गवसतात आणि आपण विस्मयचकित होऊन जातो. या कोपर्‍यांतून आठवणींचा खजिना दडलेला असतो. काळाच्या ओघात त्यातून कोणते रत्न हाती लागेल सांगता येत नाही. काळ बदलतो , वेळ बदलते , संदर्भ बदलतात , व्यक्ती आणि गोष्टीही बदलतात ; पण ते कोपरे तसेच राहतात. हे कोपरे प्रत्येकाच्या मनात असतात. सगळ्यांनाच ते जाणवतील असं नाही. पण ज्यांना हे कोपरे गवसले , ते खरंच भाग्यवान! कधी एकांतात एकट्या क्षणी अचानक हळवे झालात आणि त्यातून सावरायची ताकद असूनही सावरावंसं नाही वाटलं , तर तो कोपरा तुम्हाला गवसला