Skip to main content

समांतर

 



काचेअलीकडे बसलेले मी

इमारतींच्या मागून डोकावणाऱ्या तुला बघत बसते

आपली खूप ओळख आहे असं नाही

पण तू अनोळखी तरी कुठे आहेस?

वाढणाऱ्या वेगाबरोबर तुला बघण्याची वाढत जाणारी तीव्र ओढ

आणि तुला जवळ घेण्याचा अनावर होत असलेला मोह

इमारतींच्या खिडक्या लुकलुकत राहतात डोळ्यांसमोर

नजरेतला तू मात्र हटत नाहीस

धावणाऱ्या वेगाबरोबर श्वासांचा वाढता वेग

आणि त्याच गतीने वाढणारी तुझ्याकडे झेपावण्याची ओढ

मग खेळतोस तू खेळ लपाछपीचा मोठ्या इमारतींमागून

तरळत राहते तुझी प्रतिमा डोळ्यांसमोर

तुझ्यापेक्षा मग तुझ्या प्रतिमेसाठीची आसक्ती वाढत जाते

आणि मग अस्वस्थ व्हायला लागतात एकेक अणुरेणू श्वासातले

मंदावत जातो वेग आणि कानावर पडतात अनोळखी आवाज

तितक्यात कुठूनशी चुकार रातराणी भिरकावून देते आपला गंध उघड्या काचेतून आत

आणि मग अस्वस्थ श्वासांच्या लयीवर नाचत राहतो तो सुवास

अंतरात दरवळत जातो, रोमारोमांत तरळत जातो मंद मंद

मग डोळ्यांसमोर अवतरते तुझी प्रतिमा

पण आता प्रतिमेपेक्षा तुझी ओढ अधिक आहे

झाडांच्या मागे लपलेला तू अजून हवाहवासा वाटतोस

श्वासांत भिनलेली मोहक रातराणी तुझ्या सहवासाची सय वाढवायला लागते

मग सुरु होतो खेळ वाट बघण्याचा

तुला शोधण्याचा

पुन्हा मोहात पडण्याचा

आणि मोहात पाडण्याचा

हळूहळू वेग वाढत जातो

आणि विचारांची लयही

तुझी सयही

टिपेला पोचलेला वाट बघण्याचा सूर

मनाला अस्वस्थ करत असलेली ओढ

डोळ्यांतली तू पुन्हा दिसावास ही आस

मनात, डोळ्यांत, डोक्यात उठलेलं संमिश्र विचारांचं काहूर

पण या सगळ्यांत तू मात्र शांत

अंतराळातल्या अंधारात तुला शोधणाऱ्या नजरेला अचानक तुझं दर्शन

आणि विचारांच्या पाचोळ्याबरोबर उडून गेलेला कोलाहल

विरून गेलेल्या सगळ्या प्रतिमा

या विश्वाच्या प्रतलावर आता फक्त तू आणि मी

समोरासमोर

दार उघडता क्षणी झेपावंसं वाटलं तुझ्या मिठीत

पण मग जाणीव झाली तुझ्या माझ्यातल्या भौतिक अंतराची

अंतरी तू नेहमीच होतास

मग का अचानक या अंतराचा त्रास वाटला?

तुझ्या मंद हसण्याचा आभास झाला

त्या हसण्याचं चांदणं अलगद अंगावर सांडलं

मोहरून गेले मी

तुझ्या स्पर्शाने

तुझ्या नजरेने

तुझ्या अस्तित्वाने

मग लक्षात आलं

तू नेहमीच माझ्या सोबत होतास

आहेस

असशील

आयुष्यात

मनात

नजरेसमोर

तरीही... समांतर

आणि मग त्या समांतर प्रतलात माझ्याबरोबर चालत राहते तुझी आठवणही ही


- कायांप्रि 


Comments

Popular posts from this blog

Dreams

  Though he cried a little At least he cried a little   Maybe he caused some troubles But always gave the doubles   Dreamt of impossible Behaved unreasonable But with passion incomparable   The more he fight The more the delight The higher his dreams took flight   Fell, trampled over Tricked, tripped, but lost never   Always a believer Always a dreamer - Kayanpri 

What Are You?

A person is like a photograph. When we alter that photo with some photographic effects, the perception of looking at that photo changes though it’s the same photograph. Every photo contains same basic colors. We intensify some of the colors from some of the points, we get a different look. We take it in a black and white form, we can’t see the colors of the picture. Take it in colorful form, barely can see the simplicity. Then what makes the difference? Lights, camera, mood, situation, angles, depth, focus, colors, photographer’s view point, viewer’s point of view and so on… A person is like a dish. It’s made up of various ingredients and sometimes, forms a totally different taste. Every dish, too, has some same basic ingredients. With these same ingredients, number of dishes could be made. So if every dish is made up of some same ingredients, why it tastes different? The way of making it, cooking style, process, sequence of adding ingredients, time, temperature, heat, prese...

सत्य

सत्य ... हा केवळ एक भास आहे . पटत नाही ना ? पण हेच सत्य   आहे . जगातलं शाश्वत किंवा त्रिकालाबाधित सत्य कोणतं , असं विचारलं तर त्याचं उत्तर कोणीही देऊ शकणार नाही . स्वतः काळही नाही . सत्य अबाधित असू शकत नाही . त्याला नेहमी अपवाद असतात जे त्याच्या अखंडपणाला बाधा आणत असतात . सत्य खरंच एक भास आहे . एखादी गोष्ट ‘ पूर्ण सत्य ’ आहे असे कुणी छातीठोकपणे सांगू शकेल का ? आपल्याला गोष्टी एकाच बाजूने दिसतात आणि मग त्याच आपण ‘ पूर्ण सत्य ’ मानून चालतो . सत्य नाण्याच्या दोन बाजूंसारखं दोन भागांत विभागलेलं असतं - एक , जे आपल्याला दिसतं ; दुसरं , जे त्यामागे असतं . म्हणजे जे आपल्याला माहीत झालेलं असतं ते ‘ अर्ध ’ सत्य असतं आणि तरीही लोक ‘ मला पूर्ण सत्य माहीत आहे ’  चा दावा करतात बिनधास्त . नाण्याच्या दोन्ही बाजू एकदम कधीच बघता येत नाहीत . एक बघावी तर दुसरीने पाठ फिरवलेली . हां , आरशासमोर उभे राहिलात तर एकाचवेळी दोन्ही बाजू बघता येतील . पण हे ही लक्षात ठेवायला हवं की त्या न...