काचेअलीकडे बसलेले मी इमारतींच्या मागून डोकावणाऱ्या तुला बघत बसते आपली खूप ओळख आहे असं नाही पण तू अनोळखी तरी कुठे आहेस? वाढणाऱ्या वेगाबरोबर तुला बघण्याची वाढत जाणारी तीव्र ओढ आणि तुला जवळ घेण्याचा अनावर होत असलेला मोह इमारतींच्या खिडक्या लुकलुकत राहतात डोळ्यांसमोर नजरेतला तू मात्र हटत नाहीस धावणाऱ्या वेगाबरोबर श्वासांचा वाढता वेग आणि त्याच गतीने वाढणारी तुझ्याकडे झेपावण्याची ओढ मग खेळतोस तू खेळ लपाछपीचा मोठ्या इमारतींमागून तरळत राहते तुझी प्रतिमा डोळ्यांसमोर तुझ्यापेक्षा मग तुझ्या प्रतिमेसाठीची आसक्ती वाढत जाते आणि मग अस्वस्थ व्हायला लागतात एकेक अणुरेणू श्वासातले मंदावत जातो वेग आणि कानावर पडतात अनोळखी आवाज तितक्यात कुठूनशी चुकार रातराणी भिरकावून देते आपला गंध उघड्या काचेतून आत आणि मग अस्वस्थ श्वासांच्या लयीवर नाचत राहतो तो सुवास अंतरात दरवळत जातो, रोमारोमांत तरळत जातो मंद मंद मग डोळ्यांसमोर अवतरते तुझी प्रतिमा पण आता प्रतिमेपेक्षा तुझी ओढ अधिक आहे झाडांच्या मागे लपलेला तू अजून हवाहवासा वाटतोस श्वासांत भिनलेली मोहक रातराणी तुझ्या सहवासाची ...
Writings by ©Kayanpri