सत्य ... हा केवळ एक भास आहे . पटत नाही ना ? पण हेच सत्य आहे . जगातलं शाश्वत किंवा त्रिकालाबाधित सत्य कोणतं , असं विचारलं तर त्याचं उत्तर कोणीही देऊ शकणार नाही . स्वतः काळही नाही . सत्य अबाधित असू शकत नाही . त्याला नेहमी अपवाद असतात जे त्याच्या अखंडपणाला बाधा आणत असतात . सत्य खरंच एक भास आहे . एखादी गोष्ट ‘ पूर्ण सत्य ’ आहे असे कुणी छातीठोकपणे सांगू शकेल का ? आपल्याला गोष्टी एकाच बाजूने दिसतात आणि मग त्याच आपण ‘ पूर्ण सत्य ’ मानून चालतो . सत्य नाण्याच्या दोन बाजूंसारखं दोन भागांत विभागलेलं असतं - एक , जे आपल्याला दिसतं ; दुसरं , जे त्यामागे असतं . म्हणजे जे आपल्याला माहीत झालेलं असतं ते ‘ अर्ध ’ सत्य असतं आणि तरीही लोक ‘ मला पूर्ण सत्य माहीत आहे ’ चा दावा करतात बिनधास्त . नाण्याच्या दोन्ही बाजू एकदम कधीच बघता येत नाहीत . एक बघावी तर दुसरीने पाठ फिरवलेली . हां , आरशासमोर उभे राहिलात तर एकाचवेळी दोन्ही बाजू बघता येतील . पण हे ही लक्षात ठेवायला हवं की त्या नाण्याबरोब
Comments
Post a Comment