फार चुकले आजपर्यंत
यापुढे त्या चुका करणार नाही
बोलणार आता मीही
शब्द मुका करणार नाही
फार सोसले आजपर्यंत
यापुढे सोसणार नाही
स्वतःच्याच मानहानीला
आता मी पोसणार नाही
ठोकरलंय जगानं मला
यापुढे धक्के खाणार नाही
अस्तित्वच नाकारलंय माझं
माझ्याशिवाय आता जगू देणार नाही
फार झालं आता सगळं
माझ्या भावनांना किंमतच नाही
काय वाटलं जगाला
काय माझ्यात हिंमतच नाही?
दाखवायचंय आता जागाला
ही सुप्त ठिणगी जागृत झाली आहे
जागृतीच्या या आगीत आता
जग जाळायची हिंमत आली आहे
हरवलेलं बालपण आता
कर्तृत्व बनून हसणार आहे
कोळसा म्हणून हिणवलेला हिरा
आता कोंदणात बसणार आहे
-कायांप्रि
Comments
Post a Comment