Skip to main content

Posts

Showing posts from August, 2018

गर्दी

गर्दी...  विचारांना प्रवाही ठेवणारी प्रवाहांच्या दिशा बदलणारी माणसांचे भोवती गोतावळे विचारांसाठी रान मोकळे गर्दी...  बाहेर माणसांची , आत विचारांची गर्दीतले विचार , गर्दी विचारांची गर्दी...  बाहेर संभाषणांचा गलका आत शांततेसाठी भडका गर्दी...  सगळ्यांना सामावून घेणारी पण तरीही अनोळखी माणसांत असूनही माणुसकीला पारखी गर्दी...  एक सुख जिवंतपणाचं गर्दी...  एक दुःख दुरावलेपणाचं गर्दी..... -कायांप्रि

What Are You?

A person is like a photograph. When we alter that photo with some photographic effects, the perception of looking at that photo changes though it’s the same photograph. Every photo contains same basic colors. We intensify some of the colors from some of the points, we get a different look. We take it in a black and white form, we can’t see the colors of the picture. Take it in colorful form, barely can see the simplicity. Then what makes the difference? Lights, camera, mood, situation, angles, depth, focus, colors, photographer’s view point, viewer’s point of view and so on… A person is like a dish. It’s made up of various ingredients and sometimes, forms a totally different taste. Every dish, too, has some same basic ingredients. With these same ingredients, number of dishes could be made. So if every dish is made up of some same ingredients, why it tastes different? The way of making it, cooking style, process, sequence of adding ingredients, time, temperature, heat, prese

...तू पुन्हा परतून यावे

अंधार एकांत दाटला हा मज कोठ जावे ना कळे जीवनाच्या वाळवंटी आशेची ही मृगजळे विश्वास पडला धारातीर्थी पानिपतचा संग्राम हा शूरास संजीवनीच दुर्लभ काय दैवदुर्विलास पहा! विझती मृत्यूच्या कुशीत श्वास अंती कोवळे... नकाराच्या अपयशा पुन्हा तुसडाच हा नकार का श्वासाहूनी अनमोल जीव मग आत्मघात पर्याय का शोधा पहा लपले कुठे डोळे निरागस भाबडे... वर्जिलेल्या उष्ट्यावरी कुत्र्यांच्या सजती पत्रावळी हातावरी पण पोट ज्याचे नशिबात ना भाकर शिळी हाताची खाज संपे कधी ना जिव्हा सदोदीत पाघळे... बुद्धीबल की वित्तबल हे का ही फोफावते गं फांदी काळी-पांढरी , कृष्ण-धवल दुटप्पी आहेत सर्व प्यादी असह्य मज ही स्पंदने अन् भावनांची वादळे... हे अलौकिक बालपणा तू पुन्हा परतून यावे सुखात अज्ञानाच्या पुन्हा तू मला लोटून द्यावे नको कोरडी ती मलमपट्टी ना जखम जी भळभळे जीवनाच्या वाळवंटी आशेची ही मृगजळे... -कायांप्रि