शब्दांचेच सारे
शब्दांचेच
वारे...
शब्दांचे पसारे
शब्दांचे
किनारे...
खेळणं सोपं नाही. शब्दांशी
खेळणं तर मुळीच नाही. पण मग मनातल्या भावनांना,
विचारांना कुठे आणि कशी वाट मोकळी करून द्यावी? ती कागदावर
मोकळी करावीशी वाटते. पण मी चित्रकार नाही. मग...? शब्दकार
व्हायला आवडेल मला. विचारांइतका स्वैर तर वाराही वाहत नाही. मग अशा विचारांना
शब्दबद्ध करणं जमेल...? शब्दांना बांधता येईल की नाही माहीत
नाही, पाठलाग मात्र करू शकेन त्यांचा.....
-कायांप्रि
Comments
Post a Comment