Skip to main content

Posts

Showing posts from March, 2023

अमरत्वाच्या आठवणी

  " कुणामुळे कुणाचं काही अडत नसतं गं आयुष्यात ." " त्याचीच तर भीती वाटते ना ." " म्हणजे ?" " आपण ज्या माणसासाठी आपलं आयुष्य वेचलं , ज्या माणसासाठी जगलो , तो माणूस आपल्याशिवायसुद्धा जगू शकतो ." " हो , पण सुखात जगू शकतो असं नाहीये ना ." " पण मग तो ते जगताना आपल्याला विसरून जाईल याची बोच मनाला जास्त खात राहते ." " असं एखाद्याला विसरणं सोपं असतं का ?" " अवघड पण नसतं ना रे ." " कुणी जाणून बुजून नसतं विसरत गं आपल्या माणसाला ." " पण गेलेला माणूस हळूहळू विस्मरणात जातो हेही तितकंच खरं आहे ना ?" "..." " ऐक ना ..." " मरण नसतं आपल्या हातात . ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात , ज्या कंट्रोल करता येत नाहीत त्यांची भीती वाटणं साहजिक आहे . त्यामुळेच हे सगळे विचार मनात यायला लागतात ." " भीती मरणाची नसते रे ... ती विस्मरणाची असते ." "..." " आपल्या आवडीच्या माण