Skip to main content

Posts

Showing posts from November, 2022

कंटाळा

  कधी कधी कंटाळा येतो . मग खूप कंटाळा येतो . मग इतका कंटाळा येतो की कंटाळा यायचासुद्धा कंटाळा येतो . अशावेळी काहीतरी लिहावंसं वाटतं . पण उठून पेन - कागद घ्यायचा कंटाळा येतो . मग विचारांची भेंडोळी सोडवत बसते मी मनातल्या मनात . त्या भेंडोळ्यांमध्ये सापडतात अनेक विचार , माणसं , प्रसंग , गोष्टी , आठवणी आणि बरंच काही . बरंच काही जे त्या भेंडोळ्यांमध्ये कायमचं हरवून जावंसं वाटतं . बरंच काही जे कधीच कुणाला कळू नये असं वाटतं . बरंच काही जे पुन्हा कधी नजरेला पडू नये असं वाटतं . असं बरंच काही आहे जे बऱ्याचदा वाटतं. पण कितीही वाटलं तरी मन कुठे ऐकतं ? ते पुन्हा शिरतं त्या भेंडोळ्यांच्या गुंतागुंतीत . मन गुंतवायचा तसा हा एक चांगला मार्ग आहे . पण गुंतण्याऐवजी कधी कधी नुसतीच गुंतागुंत वाढत राहते . त्या गुंत्याची गर्दी वाढत जाते . आजूबाजूला पसारा वाढत जातो   आणि मग तो पसारा आवरायचा जाम कंटाळा येतो . मग तो पसारा तसाच टाकून उठते मी . मन तर शांत झालेलंच नसतं . पण आता पोटही अश