Skip to main content

Posts

Showing posts from October, 2021

प्रेम

  काही भावना जशा शब्दांत व्यक्त करता येत नाहीत, तसंच प्रेमही आहे. असलेली, पण शब्दांत बांधता येत नसलेली भावना.  प्रेम. कुणाचंही कुणावरही असू शकतं. कुणाचंही कशावरही असू शकतं. व्यक्ती, वस्तू, स्वप्न, कल्पना, संकल्पना... कशावरही. सहसा आपण एखाद्या वस्तूवर, व्यक्तीवर प्रेम करतो म्हणजे काय करतो? Generally आपण एखाद्याची जेवढी काळजी करत असतो, जेवढा विचार करत असतो, जेवढा आदर करत असतो, त्यापेक्षा थोडा जास्त आपण आपल्या प्रेमाच्या माणसांबद्दल, वस्तूंबद्दल करतो. जे दाखवता येतं, ते प्रेम का? जे व्यक्त करता येतं, ते प्रेम का? Love is a feeling which you have to feel…& it feels greattttttttttt! प्रेम ही अशी भावना आहे जी प्रेमापलीकडची आहे. अव्यक्त, अनाकलनीय, अपार, अभेद्य, मन व्यापून टाकणारी आणि तरीही तिच्या अस्तित्वाची जाणीव फार अंधुक असलेली. ती असते प्रत्येकाच्या मनात पण कळते फार थोड्यांना.  कधी कधी ती आपण डोक्यावर घातलेल्या हॅटसारखी असते. आपल्याला तिचं अस्तित्व फारसं जाणवतंच असं नाही तरीही ती आपल्याला उन्हाच्या तीव्र झळांपासून वाचवते. ती दुसऱ्यांना बऱ्याचदा दिसते म्हणजे आपल्यालाही दिसेल असं नाही.