Skip to main content

Posts

Showing posts from April, 2020

नशीब

नशीब ... अजब गोष्ट आहे. कुठे असतं ? माहीत नाही. कसं दिसतं ? माहीत नाही. कुणाकडे मिळतं ? माहीत नाही. लक्ष्याकडे सगळे धावतात. ‘ हाजिर तो वजीर ’ च्या न्यायाने आधी पोचणार्‍याला ते लक्ष्य साध्य होतं. जे नाही पोचत त्यांचं... नशीब हुकतं. सगळं पदरात पडून टिकत मात्र नाही. दोष कुणाचा ? अर्थातच नशिबा चा. घरात अचानक लक्ष्मी पाणी भरायला लागते. कशामुळं ? नशीब फळफळतं म्हणून. अपघाताचा सुरा आयुष्य चिरत जातो आणि आपण म्हणतो नशीब फाटलं. सगळे मार्ग बंद होतात. शेवटचा प्रयत्न म्हणून दारावर थाप मारावी तर दार आधीच उघडलेलं. कसं ? नशिबा चे दरवाजे सताड उघडे पडले म्हणून. भरलं घर फुटून जातं. नात्यांचे तुकडे होतात. कारण ? नशीब फुटलेलं असतं त्यांचं. दरोडे होतात. खून पडतात. का ? कारण तो त्यांच्या नशिबा वरच पडलेला घाला असतो म्हणून. अनेकदा आयुष्याचा जुगार खेळत असतो आपण. पण हरतोच बर्‍याचदा. दोष कुणाचा ? नशिबा चे फासे उलटे पडले , अजून काय! रंगांनी भरत चाललेलं चित्र एकदम बेरंगी होऊन जातं. कसं ? नशीब फिसकटतं म्हणून. जंगलात भरकटलेला अचानकच योग्य रस्त्यावर येऊन उभा रहतो. अचानक ? नाही. त्याचं