कि त्तीदा तुला आठवायचं कितीदा तुला साठवायचं मी जपत राहते , तू मात्र मनमानी करून काहूर उठवायचं हु रहुरत राहते मी होत राहते तुझ्यात व्यक्त जोवर तुला कुणी छेडत नाही तोवर तू मत्र अव्यक्त तु झ्याशी बोलताना मला तुला मुठीत धरून ठेवावं वाटतं तुझं अंतरंग मत्र ओरखड्यांतून उमटतं वे ड बघ माझं तुझे ओरखडेही शब्द वाटतात तुझ्या सहवासात अकारणच कल्लोळ मनात दाटतात मी जाते आटोपशीर वागायला पसारा भलताच तुझा आवरायला गेलं की कळतं तू तर रंग ओतलायस माझा वे ळी-अवेळीही नजरेनं पाठलाग तुझा तुझ्याशिवाय रे कशी जगेन तू भेट फक्त... मग म्हणेन , “ अगंबाई! सापडलं की माझं पेन!! ” -कायांप्रि
Writings by ©Kayanpri