शब्दांचेच सारे शब्दांचेच वारे... शब्दांचे पसारे शब्दांचे किनारे... खेळणं सोपं नाही. शब्दांशी खेळणं तर मुळीच नाही. पण मग मनातल्या भावनांना , विचारांना कुठे आणि कशी वाट मोकळी करून द्यावी ? ती कागदावर मोकळी करावीशी वाटते. पण मी चित्रकार नाही. मग... ? शब्दकार व्हायला आवडेल मला. विचारांइतका स्वैर तर वाराही वाहत नाही. मग अशा विचारांना शब्दबद्ध करणं जमेल... ? शब्दांना बांधता येईल की नाही माहीत नाही , पाठलाग मात्र करू शकेन त्यांचा..... -कायांप्रि
Writings by ©Kayanpri